लोकसभा निवडणूक : `आप`च्या उमेदवारांची अशी होणार निवड!

लोकसभा निवडणूक : `आप`तर्फे निवडणूक लढवायचीय तर...

लोकसभा निवडणूक : `आप`तर्फे निवडणूक लढवायचीय तर...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘आम आदमी पार्टी’ लोकसभा निवडणूक लढवणार आहे. १५ ते २० जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होईल. ज्यात महाराष्ट्रातील मुंबईचे पाच-सहा उमेदवारांचा समावेश असू शकतो, अशी माहिती ‘आप’च्या नेत्यांकडून मिळतेय.

आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातही पक्षाला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जातोय. महाराष्ट्रात सध्या ३४ जिल्हा समित्यांचं काम झाल्याची माहिती पक्षाचे नेते मयांक गांधी यांनी दिली. पक्ष महाराष्ट्रात सध्या ४० जागा लढविण्याच्या तयारीत आहे. गडचिरोली भागात त्यांना सध्या अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जर चांगले उमेदवार मिळाले तर सर्व जागा लढू असे सांगण्यात येतंय.


‘आप’कडून निवडणूक लढवायची असेल तर...
ज्या मतदार संघातून निवडणूक लढवायची इच्छा असेल त्याच मतदार संघातून सह्यांची मोहीम राबवून कमीत कमी ५०० सह्यांचा पाठिंबा दर्शविणाऱ्या उमेद्वाराचाच विचार लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी केली जाईल, असं ‘आप’नं म्हटलंय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतही ‘आप’ने हाच फंडा उमेदवारी देताना वापरला होता. दिल्लीमध्ये केवळ १०० लोकांचा स्वाक्षऱ्यांसहीत पाठिंबा असेल त्या उमेद्वाराला निवडलं गेलं होतं. हा फंडा दिल्लीत कामी आला आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर विराजमानही झाले. आता हाच फंडा आगामी लोकसभा निवडणुकीतही अंमलात आणण्याचा निर्णय ‘आप’नं घेतलाय. देशभरातील लोकसभेच्या ३०० जागा लढविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 10:44


comments powered by Disqus