Last Updated: Saturday, October 13, 2012, 11:10
www.24taas.com, आग्राआग्रा शहरातील एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला आज पहाटे दोनच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि होत्याचं नव्हतं झालं. ब्रज मोहन आणि त्यांची पत्नी या दुर्घटनेतून बचावलेत, पण मुलं-सुना-नातवंडांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय.
इमारतीच्या तळमजल्यावर ब्रज मोहन यांचं दुकान आहे. ते आणि त्यांची पत्नी तिथेच राहत होते, तर बाकीचा परिवार वरच्या मजल्यांवर राहत होता. रात्री लाइट गेलेले असताना, त्यांच्या नातवंडाने अभ्यासासाठी मेणबत्ती लावली होती. पण, झोपायला जाताना ती विझवायला तो विसरला. हीच मेणबत्ती नंतर ज्वलनशील रंगांच्या डब्यावर पडली असावी आणि आग पसरत-पसरत सिलिंडरपर्यंत पोहोचल्यानं मोठा स्फोट झाला असावा, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केलाय.
First Published: Saturday, October 13, 2012, 11:02