केजरीवाल यांच्यापेक्षा ममता `त्यागी` - अण्णा हजारे mamta is more solitaire then kejariwal - anna haz

केजरीवाल यांच्यापेक्षा ममता `त्यागी` - अण्णा हजारे

केजरीवाल यांच्यापेक्षा ममता `त्यागी` - अण्णा हजारे

www.24taas.com, झी मीडिया, इंदूर

अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अधिक त्यागी आहेत.

भविष्यात ममता बॅनर्जी देशाच्या पंतप्रधान झाल्या, तर ही देशासाठी खूप चांगली गोष्ट असेल असंही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे.

अण्णा हजारे इंदूरमधील प्रेस क्लबकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रेस से बात या कार्यक्रमात बोलत होते.

ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी त्या सरकारी गाडी आणि बंगल्याचा वापर करीत नाहीत, साधे कपडे वापरतात आणि हवाई चप्पल पायात असते.

बड्या उद्योगांपेक्षा ममतांनी छोट्या गावांच्या विकासावर लक्ष्य केंद्रीत केलं असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं.

ममता बॅनर्जींना मी पंतप्रधानपदाच्या योग्य मानतो, मात्र हे माझे वैयक्तिक विचार आहेत, मात्र मी तृणमूल काँग्रेस पक्षाचं समर्थन करत नसल्याचंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 13:29


comments powered by Disqus