Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:38
www.24taas.com, लखनौप्रेयसीच्या चारित्र्याबद्दल संशय घेणार्या एका नराधमाने आपल्या प्रेयसीला १० फुट खड्ड्यात जिवंत गाडून टाकल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे घडली आहे.
सहारणपूर जवळील नौशाद नामक माणसाने १४ वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. नौशाद विवाहीत असून तीन मुलांचा बाप होता. तरी तो गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी या मुलीला घेऊन नौशादने गावातून पोबारा केला होता. त्यानंतर दोघेही मंगळुरजवळ राहू लागले होते. मुलीचा शोध घेत पोलीस जेव्हा मंगळुरूला पोहोचले, तेव्हा त्यांना समजलं, की नौशादने मुलीचा खून केला आहे.
साधारण एक महिन्यापूर्वी नौशादने मुलीला १० फुट खोल खड्डा खणून त्यात गाडून टाकल्याचं समोर आलं. नौशाद मंगळुरूजवळच्या गावात जेसीबी चालवण्याचं काम करत होता. त्याला मुलीच्या चारित्र्याबद्दल संशय येत होता. म्हणून त्याने आपल्या गावाजवळच एक १० फूट खोल खड्डा खणला. दुसऱ्या दिवशी मुलीला या खड्ड्यात आपली एक वस्तू पडल्याचं सांगून मुलीला खड्ड्यात उतरवलं. त्यानंतर जेसीबीने तिच्यावर माती टाकत त्याने तिला जिवंत गाडून टाकलं.
नौशाद सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला सध्या न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
First Published: Thursday, March 7, 2013, 15:38