Last Updated: Wednesday, March 13, 2013, 16:54
www.24taas.com, नवी दिल्ली यंदा मान्सून वेळेअगोदर भारतात दाखल होईल, या हवामान खात्याच्या अंदाजाचं शरद पवारांनी खास शैलीत स्वागत केलयं. देशात समाधानकारक पाऊस झाल्यास बारामतीची साखर त्यांच्या तोंडात पडो अशी पवारांनी उत्फुर्त प्रतिक्रिया दिली.
राज्यात मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सध्या पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे हवामान खात्याने पावसाचा संकेत दिल्याने आशादायी चित्र उभे राहिले आहे.
दरम्यान, राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीये. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत मदतीचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला अर्थमंत्री पी चिदम्बरम, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री के व्ही थॉमस, योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया उपस्थित होते.
राज्यात दुष्काळाची परिस्थीती अतिशय गंभीर झाल्यामुळं राज्य सरकारनं २२०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र केंद्रान केवळ १२०७ कोटी रुपये राज्याच्या पदरात टाकले आहेत. राज्यातल्या विरोधी पक्षांनी मात्र केंद्राची मदत तुटपुंजी असल्याची टीका करत नऊ हजार कोटींच्या मदतीची मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी केलीय.
First Published: Wednesday, March 13, 2013, 16:54