Last Updated: Tuesday, June 11, 2013, 18:15
www.24taas.com, झी मीडिया, बिकानेरइलाज करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेला एका तांत्रिकाने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. बिकानेर येथील कोलवाली पोलिस ठाण्यात खरनाडा निवासी श्याम भारती यांनी तांत्रिक सीताराम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
श्याम भारती यांची बहीण नागौर येथे लग्न करून गेलीह होती. याच ठिकाणी आपल्या काही समस्यांसाठी ती पंचमुखी हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या तांत्रिक सीताराम याच्याकडे बिकानेरला येत होती.
गेल्या २० दिवसांपूर्वी अशीच ती नागौरहून बिकानेराल आली होती. पण आतापर्यंत घरी पोहचली नाही. तिच्या सोबत एक १३ आणि १० वर्षांचे मुलं होती. विवाहीत महिलेच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 18:02