बलात्कार रोखण्यासाठी वयातील मुलींची लग्न करा – चौटाला, Marry girls young to prevent rape, says Chautala

रेप टाळण्यासाठी १५ व्या वर्षीच लग्न योग्य – चौटाला

रेप टाळण्यासाठी १५ व्या वर्षीच लग्न योग्य – चौटाला
www.24taas.com, नवी दिल्ली

हरियाणात गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्याने चिंता वक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी धक्कादायक विधान केले आहे. बलात्कार रोखण्यासाठी वयात आलेल्या मुलींची लग्न लावून द्या, असे चौटाला म्हणालेत. यामुळे या विधानावरून आता वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

हरियाणामध्ये गेल्या आठवड्यात एका दलित अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर तिने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले होते. त्यानंतर बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी अधिक कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर चौटाला यांनी आश्चर्यकारक आणि बेजबादार वक्तव्य केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बलात्कार रोखण्यासाठी १५ वर्षांपर्यंतच्या मुलींची लग्न लावली पाहिजे. तेच योग्य आहे. यामुळे बलात्कारात वाढ होणार नाही. याचा गांभीर्याने विचार केला जावा, असे बेजबाबदार विधान चौटाला यांनी केले. तसेच खाप पंचायतीने कायदा कायदा करण्याचा निर्णय केला आहे. तर कमी वयाच्या मुलींची लग्न लावली गेली तर बलात्काराच्या घटना होणार नाहीत, असे खापने म्हटले आहे. याबाबत चौटाला यांनी खाप पंचायतीचे समर्थन केले आहे.

भारत हा एक लोकशाहीप्रधान देश असून, कायदा बनविण्याची जबाबदारी संसदेकडे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आणि न्यायव्यवस्थेकडे आहे. त्यामुळे खाप पंचायत किंवा इतर कोणीही कायदे बनवू नयेत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते. त्यामुळे चौटाला यांनी केलेले विधान धक्कादायक आहे.

First Published: Wednesday, October 10, 2012, 15:48


comments powered by Disqus