Last Updated: Sunday, February 9, 2014, 22:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपाकिस्तानातली परिस्थिती अतिशय भयानक आहे, पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करतोय हे, अख्या जगाला माहित आहे. मात्र पहिल्यांदा पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने ही बाब मान्य केली आहे.
ही पत्रकार म्हणजे आपले मंत्री महोदय शशी थरूर यांची मैत्रिण मेहर तरारने म्हटलं आहे. मेहर तरारने ट्वीटरवरून शशी थरूर यांच्यावरील प्रेम जाहीर केलं होतं.
यानंतर शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात भांडण झाल्याची चर्चाही ट्वीटरवरून रंगली होती.
मेहर तरारने आधी देशात सुधारणा केल्या नाहीत आणि काश्मीर हवाय असं ट्वीट केलं आहे. तसेच पाकिस्तान आपलं प्रेम असल्याचंही तिने दुसऱ्या ट्वीटमधून स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानातील परिस्थिती सुधारावी म्हणून आपण ट्वीट करतच राहणार असंही तिने म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 9, 2014, 18:49