पाकिस्तान सांभाळता येत नाही, आणि आणखी काश्मीर हवाय!

Last Updated: Sunday, February 9, 2014, 22:13

पाकिस्तानातली परिस्थिती अतिशय भयानक आहे, पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करतोय हे, अख्या जगाला माहित आहे. मात्र पहिल्यांदा पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने ही बाब मान्य केली आहे.

सुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खूणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट

Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:56

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असलेली माहिती म्हणजे सुनंदाच्या दोन्ही हातांवर अनेक जखमा असून चावा घेतल्याचीही खूण आहे.

मृत्यूचं गूढ: मृत्यूपूर्वी सुनंदा आणि शशी थरूरमध्ये झालं होतं भांडण

Last Updated: Sunday, January 19, 2014, 12:42

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. नवनवे खुलासे समोर येतायेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टमनंतर केलेला असतानाच, या प्रकरणाचा गुंता आणखी वाढवणारी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वीच, थरूर आणि सुनंदा यांच्यात १५ जानेवारीला विमानातच जोरदार भांडण झाल्याचं समोर आलंय.

मृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?

Last Updated: Sunday, January 19, 2014, 16:58

केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू पूर्वी त्यांनी पत्रकार आणि सुनंदा यांची मैत्रिण असलेल्या नलिनी सिंग यांना फोन केला असल्याचं स्पष्ट झालंय. नलिनी सिंग यांनी याबाबत माहिती दिलीय.

‘ओह माय गॉड’… मेहर तरार यांची प्रतिक्रिया!

Last Updated: Friday, January 17, 2014, 23:04

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पण, त्यांच्या मृत्यूनं मात्र सगळ्यांनाच धक्का बसलाय. असाच धक्का सुनंदा पुष्कर यांच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनाही बसलाय. मेहर तरार यांनी ‘ओह माय गॉड’ असं ट्विट केलंय.

आयएसआय एजंट सोबत शशी थरूर यांचं अफेअर- सुनंदा पुष्कर

Last Updated: Thursday, January 16, 2014, 11:52

नेहमीच विविध वादांमध्ये अडकणारे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. मात्र यावेळी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनीच शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तानी पत्रकारसोबत अफेअर असल्याचा आरोप केलाय.

केंद्रीय मत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

Last Updated: Thursday, January 16, 2014, 11:27

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. हॅक केल्यानंतर या अकाऊंटवरन एका पाकिस्तानी पत्रकारानं काही रोमॅन्टिक मॅसेज सुद्धा पाठवले आहेत.