जावेद मियाँदादचा भारतदौरा रद्द , Miandad cancels India trip amidst controversy

जावेद मियाँदादचा भारतदौरा रद्द

जावेद मियाँदादचा भारतदौरा रद्द
www.24taas.com, नवी दिल्ली

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादनं भारत दौरा रद्द केलाय. जावेद मियाँदाद हा भारताला वॉण्टेड असलेल्या दाऊद इब्राहिमचा व्याही आहे. त्यामुळं त्याच्या भारत दौऱ्याला काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केला होता.

जावेद मियाँदाद भारत पाकिस्तान क्रिकेट टीमचा ६ डिसेंबरला होणारा दिल्लीतला सामना पाहायला येणार होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंच जावेद मियाँदादवर भारत दौरा रद्द करण्यासाठी दबाव आणला आणि त्यामुळेच त्याला दौरा रद्द करावा लागला, अशी चर्चा पाकिस्तमधील प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि मुंबई बॉम्बस्फोटा प्रकरणातला वॉन्टेड आरोपी दाऊद इब्राहिम याच्या व्याह्याला भारतात येण्यासाठी व्हिजा दिला जाऊ नये, यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेनंही विरोध केला होता. मियाँदाद यांचा मुलगा जुनैद याचं लग्न दाऊद इब्राहिम याची मुलगी माहरुख हिच्याबरोबर झालं आहे. संपूर्ण जगभरात मोस्ट वॉन्टेडच्या यादीत झळकलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा शोध मुंबई पोलीसही घेत आहेत. १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊदचा शोध सुरू आहे.

First Published: Friday, January 4, 2013, 18:11


comments powered by Disqus