Last Updated: Thursday, January 3, 2013, 18:56
www.24taas.com, नवी दिल्लीपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादला व्हिसा देण्यास काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केला आहे. मियांदाद देशाचा शत्रु असलेल्या दाऊदचा व्याही आहे.
त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकाला व्हिसा देणं म्हणजे देशातील जनतेच्या भावनांशी खेळ करण्यासारखं होईल असं काँग्रेसचे प्रवक्ता जगदंबिका पाल यांनी म्हटलं आहे.
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मियांदादला देशात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. सध्या सुरू असलेल्या इंडिया पाकिस्तान सीरिजआधीही पाकिस्तानी खेळांडूना असाच विरोध झाला होता. त्यामुळे आत जावेद मियांदादला ही असाच विरोध होत असल्याने मियांदादला व्हिसा मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
First Published: Thursday, January 3, 2013, 16:47