सून बनवण्याचं आश्वासन देऊन मंत्र्यांनी केलं लैंगिक शोषण! Minister molests woman

सून बनवण्याचं आश्वासन देऊन मंत्र्यांनी केलं लैंगिक शोषण!

सून बनवण्याचं आश्वासन देऊन मंत्र्यांनी केलं लैंगिक शोषण!
www.24taas.com, झी मीडिया, तिरुअनंतपुरम

नेते मंडळी जनतेला आश्वसनं देऊन फसवत असल्याचं नेहमीच दिसून आलं आहे. मात्र जेडी(एस)च्या एका आमदरांनी हद्दच गाठली. एका मुलीला सून बनवून घेण्याचं आश्वासन देत तिचं दोन वर्षं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या आमदारांवर झाला आहे.

लैंगिक शोषण झालेल्या महिलेनेच यासंबंधात तक्रार केली असून पुरावा म्हणून लैंगिक शोषणाची व्हिडिओ क्लिपच या महिलेने सादर केली आहे. माजी मंत्री आणि आमदार थेटायिल आणि त्यांचा मुलगा आदर्श या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लग्नाचं आमिष देऊन बाप आणि मुलगा दोघांनीही तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.

सुमारे दोन वर्षं खोट्या आश्वासनांना बळी पडून बलात्कार झाल्यावर आदर्श दुसऱ्याच मुलीशी लग्न करत असल्याची माहिती संबंधित महिलेस मिळाली. या महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेने कोर्टात पुरावा सादर करता यावा, म्हणून आपल्यावर होणाऱ्या लैंगिक शोषणाचा व्हिडिओही तिने चोरून तयार केला. आधी आदर्शने लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर वडिलांशी शारीरिक संबंध ठेवण्याचीही त्याने जबरदस्ती केली, असा आरोप या महिलेने केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 16:15


comments powered by Disqus