Last Updated: Wednesday, December 11, 2013, 15:47
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीतील उच्चभ्रू आणि मध्यवर्ती भाग असलेल्या कॅनॉट प्लेस या भागात आठ डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर नराधम पीडितेला पार्किंग लॉटमध्ये टाकून फरार झाले.
मूळची उत्तर प्रदेशमधील असलेली पीडित मुलगी सावत्र आईशी भांडण झाल्याने घरातून पळून आली होती. ती दिल्लीतील मेट्रो स्थानकातून बाहेर येत असताना चार नराधमांना तिला पकडले आणि सिंदीया हाऊसमागील पार्किग लॉटमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ती मुलगी बरेच तास पार्किंग लॉटमध्येच पडून होती.
अखेर त्या ठिकाणी गस्त घालणा-या पोलिसांच्या पथकाला ही मुलगी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी तात्काळ तिला नजीकच्या रुणालयात दाखल केले. तेथे तपासणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यासंदर्भात बाराखंबा पोलिस स्थानकामध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 11, 2013, 15:47