बापुंवर बलात्काराचा आरोप, मुलगा म्हणतो..., Minor girl is mentally unstable: Narayan Sai

बापुंवर बलात्काराचा आरोप, मुलगा म्हणतो...

बापुंवर बलात्काराचा आरोप, मुलगा म्हणतो...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

स्वत:ला संत म्हणवून घेणारे आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी आता त्यांचा मुलगा नारायण साई पुढे आलाय. `बापुंवर बलात्काराचा आरोप करणारी मुलगी वेडी झालीय` या शब्दांत राजकोटमध्ये एका सत्संगादरम्यान त्यांनी म्हटलंय.

यापूर्वी बापूंची प्रवक्ता नीलम दुबे हीनं आसाराम बापूची तुलना गुरुनानक देव यांच्याशी केली होती. याविरुद्ध बुधवारी शिरोमणी अकाली दल आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमेटीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आणि नीलम यांच्या अटकेची मागणी केली.

‘एखाद्यानं कोणत्याही मुलीवर मी बलात्कार केल्याचं सिद्ध केलं तर त्याला पाच लाखांचं बक्षीस देईन’ असं आसाराम यांनी जाहीर केलंय.

दुसरीकडे काही राजकीय कार्यकर्ते आसाराम यांच्या पाठिशी उभे राहिलेत. भाजप नेत्या उमा भारती आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे बापूंच्या समर्थनासाठी उतरलेत. त्यांनी बापूंवर केले जाणारे सगळे आरोप खोटे असल्याचं सांगितलंय.

काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी मात्र, ‘आसाराम या खोटारड्या गुरुवर बलात्काराचे आरोप पहिल्यांदाच लागलेले नाहीत... तर याआधीही असे आरोप त्यांच्यावर झाले होते’ असं म्हणत त्यांनी पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करू नये, तर पोलिसांना मदत करण्याचा सल्ला दिला होता.

यापूर्वी जोधपूरच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आसाराम यांच्यावर झाला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 29, 2013, 09:55


comments powered by Disqus