Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:32
www.24taas.com,थलासेरीउत्तर केरळमध्ये संताप जनक घटना घडलेय. धर्मडोमजवळच्या गावात एका १३ वर्षांच्या मुलीवर तिचे वडील, भाऊ आणि काकाने लैंगिक अत्याचार केलेत. ती त्यांच्या वासनेला दोन वर्षे बळी पडली.
हा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी उजेडात आला. ही दुर्दैवी मुलगी शाळेतून घरी जाण्यास तयार नव्हती. शिक्षकांनी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा या मुलीने तोंड उघडले आणि आपलेच सख्खे नातेवाईक गेली दोन वर्षे लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. शाळेच्या व्यवस्थापनाने लागलीच पोलीसांकडे तक्रार केली.
तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिघानांही पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन असलेल्या तिच्या भावाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
सहाव्या इयत्तेत गेल्यापासून आपल्यावर हे तिघे अत्याचार करत असल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले. या मुलीच्या मोठ्या बहिणीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तिच्यावरही बलात्कार झाला होता, अशी माहिती या मुलीने पोलिसांना दिली आहे. पिढीत मुलीला बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आले आहे. तिच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
First Published: Tuesday, November 27, 2012, 10:32