Last Updated: Wednesday, March 26, 2014, 13:57
www.zee24taas.com, झी मीडिया, मथुरा मथुरामधून भाजपने उमेदवारी दिलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी राज्यसभा सदस्य हेमा मालिनीवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेत्यांना दहा वाहनांनी रोड शो करण्याची परवागी देण्यात आली होती असे, शहरातील दंडाधिकारी राजेश कुमार प्रजापती यांनी सांगितले. मात्र हेमा मालिनी यांनी जवळपास ३० वाहनांसोबत मथुरामध्ये प्रवेश केला.
भाजप उमेदवार हेमा मालिनी पहिल्यादांच मथुरामध्ये गेल्या होत्या. त्यामुळे ड्रिमगर्लला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची आणि समर्थकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. पोलिसांनाही त्या गर्दीला आवरणं कठीण झालं होत. ८० कि.मी. अतंराचा रोड शो पूर्ण करण्यासाठी हेमा मालिनीला चक्क ९ तास लागले.
उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या कार्यक्रमानुसार, हेमामालिनी नंदगाव, बरसाना आणि गोवर्धनमधील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्या मथुरामधील श्रीकृष्णांचे जन्मस्थान यांचे दर्शन घेणार होत्या. मात्र प्रचंड गर्दीमुळे पोलिसांनी त्यांना वाहनाच्या बाहेरही येऊ दिले नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 26, 2014, 12:57