मोदी म्हणाले, "वाह क्या गर्लफ्रेंड है!" modi attacks on Tharoor`s wife

मोदी म्हणाले, "वाह क्या गर्लफ्रेंड है!"

मोदी म्हणाले,
www.24taas.com, मंडी

हिमाचल प्रदेशात प्रचारार्थ झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांचं नाव न घेता त्यांच्या पत्नीवर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींनी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख ‘५० कोटींची गर्लफ्रेंड’ असा केला. निवडणूक सभेत मोदींनी जमावाला विचारलं, “वाह! क्या गर्लफ्रेंड है...कभी आपने देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड?”

शशी थरूर यांची गर्लफ्रेंड सुनंदा पुष्कर यांना आयपीएलमध्ये कोची मध्ये ५ ट्क्क्यांची भागीदारी देण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या वादातून थरूर यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र परराष्ट्रमंत्री या पदावरून राजीनामा दिल्यावर ते आता पुन्हा मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत.

याशिवाय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांवरही जोरदार टीका केली. मनमोहन सिंग यांच्या कायम गप्प राहाण्याबद्दल टोला हाणताना मोदींनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख ‘मौन’नोहन सिंग असा केला. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी हिमाचलमध्ये गरिबांबद्दल चिंता व्यक्त केली मात्र महागाईबद्दल चकार शब्द उच्चारला नाही, असं मोदी म्हणाले.

याशिवाय जर भाजपाला निवडून दिलंत, तर प्रत्येक घरात इंडक्शन चूल देण्याचं अश्वासन नरेंद्र मोदींनी हिमाचलच्या जनतेला दिलं.

First Published: Tuesday, October 30, 2012, 08:45


comments powered by Disqus