मोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल Modi is as popular as Nehru

मोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल

मोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल
www.24taas.com, अलाहबाद

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे. भारताचे पहिले
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एवढेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जनमानसात लोकप्रिय असल्याचा दावा व्हिएचपीचे नेते अशोक सिंघल यांनी केलाय.

पंडीत जवाहरलाल नेहरूंनंतर पहिल्यांदाच एवढी लोकप्रियता असलेले मोदी सध्या देशातले एकमेव नेते असल्याचं सिंघल यांचं म्हणणं आहे. अलाहाबादमधील कुंभमेळ्यात संत संमेलनात सिंघल यांनी हे वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह कुंभमेळ्यात आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांच्या प्रस्तावित भेटीपूर्वी त्यांनी हे विधान केल्यामुळं तर्कवितर्कांना उत आलाय.

First Published: Thursday, February 7, 2013, 00:01


comments powered by Disqus