नरेंद्र मोदी,लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?, Modi to share dais with mentor Advani at ‘Karykarta Mahakumbh’ in

नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?

नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?
www.24taas.com, वृत्तसंस्था, भोपाळ

मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये भाजपचा महाकुंभमेळा भरणार आहे. इथं नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर या सभेच्या निमित्ताने मोदी-अडवाणी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

जंबुरी मैदानावर पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त होणा-या या विशेष रॅलीसाठी ५ लाख भाजप कार्यकर्ते येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मोदी सभेसाठी थेट अहमदाबादवरुन येणार आहेत. तर लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी विशेष विमानानं दिल्लीवरुन भोपाळमद्ये दाखल होणार आहे.

दरम्यान याच सभेवरुन राजकारणही रंगले आहे. सभेसाठी बुरखे खरेदी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. सभेसाठी बुरखे हे अल्पसंख्यांकांना आकर्षित करण्यासाठी ही सभा असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण याच वर्षी मध्य प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या महिन्यातच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सभा म्हणजे भाजपचं शक्तीप्रदर्शन असल्याचं सांगण्यात येत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 11:55


comments powered by Disqus