Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:41
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली निजामुद्दीन येथे एका विदेशी तरुणीचं भर रस्त्यात अपहरण करण्याचा तसंच विनयभंग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणी जर्मनीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ वर्षीय युवतीची २१ वर्षीय तरुणाने छेड काढली. ही तरुणी एका एनजीओसोबत काम करण्यासाठी दिल्लीला आली होती.
गुरूवारी रात्री १०.३० च्या सुमारास जंगपूर येथील मेट्रो स्टेशनवरून बाहेर पडून ही तरुणी एका मैत्रिणीकडे जात होती. यावेळी जंगपुराजवळील के-३ ब्लॉकजवळील बीरबल रोड येथे एका २१ वर्षीय तरुणाने तिला मागून पकडलं. एवढंच नव्हे, तर तरुणीसमोर त्या तरुणाने आपले अंगावरील सगळे कपडे काढून टाकले आणि तिच्यासोबत तो अश्लील कृत्य करू लागला. हा तरुण तिला मैदानाकडे खेचून नेण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार पाहून आणि तरुणीचं ओरडणं ऐकून आसपासच्या परिसरातील सेक्युरिटि गार्ड्स मदतीसाठी धावून आलेय त्यांना पाहाताच तो तरुण पसार झाला. एका सुरक्षा रक्षकानेच ही माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली.
आरोपीच्यी अश्लील कृत्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. या सीसीटीव्ही फुटेजेसच्या आधारावर पोलिसांनी आरोपी मनीष याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात छेडछाड तसंच रोखून बघण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनीष जंगपूरा येथेच राहातो. तो व्यवसायाने पहिलवान असल्याचं सांगण्यात येत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 17:41