केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता monsoon in kerala

केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता

केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळसह लक्षद्वीप आणि उत्तर कर्नाटकच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.

मान्सून केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होतो, असं म्हणतात. मान्सून सामान्यत: ६-७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होतो. परंतु, मान्सूनचे केरळातील आगमन लांबले गेल्याने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याच आठवड्याभराचा कालावधी लागण्याचे अपेक्षित आहे.

सध्या केरळ ते कर्नाटक या राज्यांलगत अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा होता. त्याचबरोबर मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने वाऱ्यांचा प्रवाससुद्धा अनुकूल होते. याचा परिमाण म्हणून आज मान्सून केरळात दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, देशाच्या अनेक भागात गेले दोन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. त्यात केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, ओरिसा, पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग, झारखंड, आसाम, ईशान्येकडील राज्ये, आंध्र प्रदेशचा किनारी भाग यांचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 6, 2014, 17:46


comments powered by Disqus