महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची साठेबाजांवर करडी नजर

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 19:10

गेल्या पाच महिन्यांतला रेकॉर्ड महागाई दर, मान्सून कमी होण्याची शक्यता आणि इराकमध्ये चिघळत चाललेली परिस्थिती या तीन गोष्टी सामान्यांचं कंबरडं मोडू शकतात. याच पार्श्वभूमीवर महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. याच संदर्भात मोदींनी कॅबिनेटची बैठक घेतली.

मुंबईकरांसाठी खुशखबर, मान्सून दाखल

Last Updated: Sunday, June 15, 2014, 15:38

मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतूरतेनं वाट पहात होता, तो मान्सून अखेर आज मुंबईत दाखल झालाय.

केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता

Last Updated: Friday, June 6, 2014, 17:46

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळसह लक्षद्वीप आणि उत्तर कर्नाटकच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.

येत्या 24 तासात केरळमध्ये `मान्सून येईल धावून`

Last Updated: Thursday, June 5, 2014, 17:47

हवामान खात्याने येत्या 24 तासात केरळात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल

Last Updated: Monday, May 19, 2014, 10:48

यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 22:02

मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

यंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी

Last Updated: Thursday, April 24, 2014, 22:08

यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

महाराष्ट्रभरात वरूणराजा असाच बरसत राहाणार!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:51

गेल्या काही दिवसांपासून वरूणराजानं राज्यावर कृपादृष्टी दाखवलीय. आणी येत्या काही दिवसांत वरूणराजा असाच बरसणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली.

केदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 13:58

गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

मुंबईसह उपनगरात पाऊस, लोकवर परिणाम

Last Updated: Sunday, June 9, 2013, 07:43

मुंबईसह उपनगरांत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. आज रविवार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला नाही. मात्र, शहरातील सकल भागात पाणी तुंबल्याने महापालिकेच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. ठाणे आणि नवीमुंबईत चांगला पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम मुंबई लोकवर दिसून आलाय. मध्यरेल्वेच्या गाड्या उशिरा तर मध्य रेल्वेच्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक

Last Updated: Thursday, June 6, 2013, 08:28

कोकण रेल्वेने मान्सूनसाठीचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार काही गाडयांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरसाठी लागू असेल.

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 20:53

येणार येणार म्हणत अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालंय. काल उत्तर कर्नाटकात दाखल झालेल्या मान्सूननं दोन दिवस आधीच राज्यात धडक देऊन दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला सुखद धक्का दिलाय.

दोन दिवसांत महाराष्ट्र भिजणार चिंब!

Last Updated: Monday, June 3, 2013, 18:45

राज्यात अनेक ठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. मात्र आता सर्वांना आस लागली आहे ती मान्सूनची.

आला आला वारा... संगे पावसाच्या धारा...

Last Updated: Sunday, June 2, 2013, 22:08

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या मुंबई आणि ठाणेकरांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारच्या मुहूर्तावर दिलासा दिला.

केरळात मान्सूनची वेळेवर हजेरी

Last Updated: Saturday, June 1, 2013, 23:02

सगळेजण उत्सुकतेने वाट पाहात असलेला मान्सून आज केरळात दाखल झाला. दुष्काळ तसंच उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात तो आता कधी येतोय याचीच वाट सगळेजण चातकाप्रमाणे पाहतायत.

‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 09:18

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

मान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 19:37

उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.

बळीराजासाठी खुषखबर, मान्सून सामान्य

Last Updated: Saturday, April 27, 2013, 13:24

दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजासाठी खुषखबर. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जयपाल रेड्डी यांनी दिलीय.

यंदा मान्सून वेळेअगोदर भारतात

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 16:54

यंदा मान्सून वेळेअगोदर भारतात दाखल होईल, या हवामान खात्याच्या अंदाजाचं शरद पवारांनी खास शैलीत स्वागत केलयं. देशात समाधानकारक पाऊस झाल्यास बारामतीची साखर त्यांच्या तोंडात पडो अशी पवारांनी उत्फुर्त प्रतिक्रिया दिली.

समुद्राच्या तळाशी घेणार पावसाचा शोध!

Last Updated: Monday, October 1, 2012, 09:26

पावसाचा लहरीपणा हवामान खात्यालाही व्यवस्थित समजून घेणं जड जातं. अनेकवेळा त्यांचे अंदाज खोटे ठरवण्याचं काम पाऊस करत असतो. त्यामुळे पावसाला निश्चित स्वरुपात समजून घेण्याचा प्रयत्न अजूनही चालूच आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती बदलणार

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:31

यावर्षी महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यात दुष्काळी स्थिती आहे. मात्र सप्टेंबरमध्ये दुष्काळाची स्थिती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसेल असा विश्वास हवामान खात्यानं व्यक्त केलाय. पावसावर विपरीत परिणाम करणा-या एल निनोची निर्मिती होणार नाही असंही हवामान खात्याचा अंदाज आहे.

आजपासून संसदेचं मान्सून अधिवेशन

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:31

राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.

लोकसभेचे कामकाज स्थगित

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 23:42

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.

मान्सूनची पुन्हा प्रतिक्षा

Last Updated: Monday, July 16, 2012, 13:25

पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मान्सूनची परिस्थिती चिंताजनक नाही - पवार

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 12:43

मान्सूनच्या उशीरा आगमनामुळं देशातली परिस्थिती फारशी चिंताजनक नसल्याचा निर्वाळा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. येत्या आठवड्यात मान्सून सक्रीय होईल आणि शेतीची चिंता मिटेल असा आश्वासक आशावाद शरद पवार य़ांनी व्यक्त केला.

तीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय

Last Updated: Thursday, June 21, 2012, 10:55

येत्या तीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. रविवारी मान्सूननं जोरदार एंट्री मारली.कोकण विदर्भाप्रमाणे सा-या महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला होता... मात्र मान्सून पुन्हा गायब झाला.

गेला 'मान्सून' कुणीकडे?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 18:09

मान्सून गेला कुठे असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. रविवारी वन-डे खेळून मान्सून गायब झालाय. चीनमधल्या वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय.

मुंबईत दोन दिवसात मान्सून

Last Updated: Sunday, June 17, 2012, 15:15

मुंबई मान्सून अवघ्या दोन दिवसांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून १० जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

मान्सून गोव्यात, पवारांचं साकडं

Last Updated: Monday, June 11, 2012, 23:15

महाराष्ट्रावर रुसून बसलेला मान्सून गोव्यात मात्र सक्रिय झालाय. मात्र महाराष्ट्रात मान्सून आलाय मात्र पावसाला अजूनही समाधानकारक सुरुवात झाली नाही, त्यामुळे खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शऱद पवारांनी वरुणराजाला साकडं घातले आहे.

मान्सून मध्ये पडणार 'सिनेमांचा पाऊस'

Last Updated: Thursday, June 7, 2012, 11:34

मान्सून आला रे. म्हणताना बॉलिवूडमध्येही मान्सून आला आहे तो सिनेमांचा. पावसाळ्यात प्रेक्षकांना तब्बल ३० सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. या पावसाळ्यात बॉलिवूडमध्येही सिनेमांचा पाऊस पडणार असंच दिसतं आहे.

आला मान्सून, ठेवणार मीठ झाकून

Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:09

पावसाळा अगदी तोंडावर आलाय. सर्वत्र मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. वसईतले मीठ उत्पादकही सध्या आपल्या मीठाची झाकपाक करण्यात व्यस्त आहेत. वादळाचा अंदाज घेऊन मीठ उत्पादक मीठाला झाकण्याची तयारी सुरू झाली.

मान्सून ऑडिट

Last Updated: Thursday, June 7, 2012, 08:39

अखेर मान्सून राज्यात दाखल झालाय आणि लवकरच तो मुंबईतही धडक देणार आहे. पण मान्सूनचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेनं काय तयारी केलीय? जे दावे पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येतायत, त्यात तथ्य आहे का? मुंबईत २६ जुलैसारखा पाऊस झाला तर? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात ‘मान्सून ऑडिट’मधून...

राज्यात मान्सून आला रे...

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 16:08

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. कोकण किनारपट्टीवर एक दिवस आधीच मान्सून धडकला आहे. रत्नागिरीच्या हरणेला मान्सूनचं आगमन झालं असून साताऱ्यातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

मान्सून आला रे आला........

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 15:02

गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणार मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

मान्सून ४८ तासांत धडकणार

Last Updated: Monday, June 4, 2012, 18:11

उत्तर आणि मध्य भारत कडक उन्हाने होरपळत असताना आज भारतीय हवामान खात्याने एक गुड न्यूज दिली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.

मान्सूनचे आगमन लांबलं

Last Updated: Saturday, June 2, 2012, 09:08

मान्सूनचे आगमन लांबलं आहे. मान्सूनने हवामान खात्याचा अंदाज चुकवला. शुक्रवारी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकणे अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार पावसासाठी आणखी पाच दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.

खूशखबर ! मान्सून दोन दिवस आधी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 11:21

राज्यात यंदा दोन दिवस आधीच मान्सून धडकणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेचा आहे. तर मुंबई आणि पुण्यात ७ जूनला मान्सून येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. एकंदर पाऊसमान चांगलं असेल असं भाकित वर्तवल्यानं जनतेला दिलासा मिळाला आहे.