Last Updated: Saturday, November 2, 2013, 18:25
www.24taas.com, झी मीडिया, त्रिवेंद्रपुरमकेरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीची हत्या केली. आईनेच आपल्या पोटच्या पोरीचा गळा दाबून खून केला. या नंतर जेसीबी मशिनने खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला. राणी असे या संशयित महिलेचे नाव आहे.
आपला प्रियकर रजिथ याच्याशी राणीला लग्न करायचं होतं. मात्र, राणीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीसह स्वीकारण्यास रजिथ तयार नव्हता. यावर उपाय म्हणून राणी आणि तिच्या प्रियकराने चिमुरहीची हत्या केली. रजिथ स्वतः जेसीबी मशिनचालक असल्याने त्याने आपल्या घराजवळ मुलीला पुरले. बाझील नावाच्या मित्रानेही त्यांना या क्रुरकर्मात मदत केली.
त्यानंतर राणीने स्वतःच आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. मात्र पोलिसांना संशय आला. राणीची उलट चौकशी केल्यानंतर तिने खून व त्यानंतरच्या प्रकाराची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, November 2, 2013, 18:25