आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश, MP forest officer raided, property worth Rs 42 cr found

आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश

आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश
www.24taas.com,भोपाळ

भोपाळमध्ये आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश झालाय. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक वसंत प्रताप सिंह यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकलाय. या छाप्यात तपास अधिका-यांच्या हाती मोठं घबाड लागलय.

या अधिका-याच्या घरी एकूण ४५ कोटींची मालमत्ता सापडलीये. पहाटे पाचच्या सुमारास हा छापा घालण्यात आलाय. वसंत प्रतापसिंह यांच्या उज्जैन आणि भोपाळ इथल्या घरांवर हे छापे टाकण्यात आलेत. काही तासांतच या अधिका-यांकडे ४५कोटींची संपत्ती आढळलीये.सध्या संपत्तीची मोजदाद सुरु असून आणखी मालमत्ता आढळण्याची शक्यता आहे.

भोपाळच्या घरात ७ लाख तर उज्जैनच्या घरात ३ लाख रुपयांची रोकड सापडलीये. शिवाय त्यांच्याजवळ एक पिस्तुलही सापडलयं. भोपाळमध्ये दोन घरं, उत्तर प्रदेशात अनेक हेक्टर जमीन आणि वाराणसीत एक पेट्रोलपंप आणि हॉटेल असल्याची कागदपत्र सापडलीयेत. वसंत प्रतापसिंह १९८७ च्या बॅचचे आय़एफएस ऑफिसर आहेत.

First Published: Wednesday, February 6, 2013, 16:04


comments powered by Disqus