Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:55
www.24taas.com, ग्वाल्हेरएका कारकूनाकडे पैशाचं घबाड सापडलंय. हा कारकून आहे मध्यप्रदेशातील. त्याच्याकडे सापडली आहे, एक कोटी, दोन कोटी, दहा कोटी नाही तर तब्बल ४० कोटी रूपयांची संपत्ती.
मध्यप्रदेशात एका क्लार्ककडे तब्बल 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय. अर्जुनदास लालवानी असं या क्लर्कचं नाव आहे. तो मध्य प्रदेशातल्या ऊर्जा विभागात क्लर्क म्हणून काम करतोय. ऊर्जा विभागात काम करणा-या क्लार्कच्या मालकीची 4 दुकाने, 12 घरं आणि 60 लाख रुपयांची एफडी असल्याचं समोर आलंय.
लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात हा खजाना मिळालाय. ही सगळी संपत्ती वडिलोपार्जीत असल्याचा दावा लालवानीनं केलाय़.
First Published: Tuesday, February 5, 2013, 20:39