Last Updated: Wednesday, March 27, 2013, 21:00
www.24taas.com, नवी दिल्लीसपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. काँग्रेस हा धोकेबाज पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2014ची निवडणूक ही खरी निवडणूक असं सांगत त्यांनी तिस-या आघाडीचे संकेतही दिलेत. उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा होते, मात्र दिल्लीबाबत होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.
उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था ही दिल्लीपेक्षा 10 पट चांगली असल्याचं मुलायमसिंग यादव यांनी म्हटलं. तसंच येत्या निवडणुकीत ना काँग्रेस जिंकणार ना भाजप असं म्हणत तिसऱ्या आघाडीच्या विजयासंबंधी इशारा दिला.
First Published: Wednesday, March 27, 2013, 21:00