24taas.com, Mumbai violence in session

संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार

संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार
www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला. तर राज्यसभेतही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रझा अकादकी पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप करत रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केलीय.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. सीएसटीवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


First Published: Tuesday, August 14, 2012, 15:58


comments powered by Disqus