सीएसटी स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1 बंद होणार?

Last Updated: Friday, March 28, 2014, 20:26

रेल्वेच्या अर्थसंकल्पात हार्बर मार्गावरील वाढत्या गर्दीचा विचार करून येत्या काळात हार्बर मार्गावरही १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याची घोषणा करण्यात आली.

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!

Last Updated: Friday, March 14, 2014, 15:35

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पडणारा ताण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेनं `एटीव्हीएम`, `जेटीबीएस` आणि `सीव्हीएम कूपन्स` यांसारखे पर्याय काढलेत. मात्र या यंत्रणावरही नेहमीच झुंबड उडालेली दिसते. यालाच अजून एक पर्याय म्हणून मध्य रेल्वे एक नवीन मशीन `कॉइन अँड कॅश ऑपरेटेड मशीन` (सीसीओएम) आणतंय.

खूशखबर: सीएसटीवरील प्रवाशांची तंगडतोड थांबणार

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:56

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... आता सीएसटी स्टेशनवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवरुन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आता तंगडतोड करण्याची गरज नाही. एक नवा ब्रीज सीएसटीवर तयार होतोय. तब्बल अठरा प्लॅटफॉर्मसना हा ब्रीज जोडणार आहे.

`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून

Last Updated: Thursday, December 26, 2013, 16:54

मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा अधिकारी इमारतीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा रहस्यमयरित्या जळून मृत्यू झालाय.

खूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 21:15

आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी

Last Updated: Monday, July 22, 2013, 09:08

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर झालेत. कर्जत-सीएसटी लोकलमधून पडल्यानं ही दुर्घटना घडलीय.

लवकरच सुरू होणार `ईस्टर्न फ्री वे`

Last Updated: Saturday, June 1, 2013, 17:59

मुंबईकरांचा प्रवास जलद करणारा ‘इस्टर्न फ्री वे’ जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होतोय.

हार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 16:22

हार्बरवासीयांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिलेय. मेगाब्लॉक जरी हार्बर रेल्वेवर असला तरी पनवेल-सीएसटी आणि सीएसटी-पनवेल सेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरवरील प्रवाशांचे मेगाहाल थांबणार आहेत.

‘रेकॉर्डब्रेक’ भारतीय रेल्वे

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 09:26

आज तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेलात आणि रेल्वे स्टेशनवर आकर्षक रोषणाई पाहिलीत तर आश्चर्यचकित होऊ नका... कारण...

‘सीएसटी’तून छत्रपती गायब!

Last Updated: Saturday, March 30, 2013, 10:39

काळाच्या ओघात आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं ‘सीएसटी’तून छत्रपती हे शब्द गायब झाले आहेत.

सीएसटी दंगल: अहमद रझाला अटक

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:30

11 ऑगस्टला आझाद मैदान आणि सीएसटीवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी मोर्चाच्या एका आयोजकाला अटक करण्यात आली आहे. आझाद मैदानातल्या हिंसाचार प्रकरणी, मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली.

सीएसटी सुटकेस किलरचा छडा

Last Updated: Saturday, October 13, 2012, 21:21

मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या सीएसटी सुटकेस किलर प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय. याप्रकरणी आरोपी प्रवीण ठाकरेला अटक करण्यात आलीय.

दाऊदने घडवला सीएसटी हिंसाचार- गुप्तचर संस्था

Last Updated: Friday, September 7, 2012, 21:47

सीएसटी हिंसाचाराचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहचले होते. पण आता तेच धागेदोरे हे दुबईपर्यंत पोहचले असल्याचे गुप्तचर संस्थेने सांगितले.

मनसे `सुसाट`, मोर्चाने कोणाची लागणार `वाट`?

Last Updated: Monday, August 20, 2012, 18:07

मनसेनं उद्याच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहेत.

`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`

Last Updated: Sunday, August 19, 2012, 18:46

राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.

सीएसटीचे दंगेखोर सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Thursday, August 16, 2012, 15:05

गेल्या आठवड्यात मुंबईतल्या सीएसटी परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनातील दंगलखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. हातात बंदुका घेऊन धुडगूस घालणारे काही तरुण सीसीटीव्हीत कैद झाल्याने दंगेखोरांचा पर्दाफाश झालाय.

संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 15:58

मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला.

...अन् आमच्या मुंबई पोलिसांनी मार खाल्ला

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 12:02

सीएसटीवर झालेल्या दंगलीत खऱ्या अर्थाने बळी पडले ते पोलीस आणि पत्रकार. पोलीस, महिला पोलीस शिपाई यांना मारहाण करण्यात आली.

कसाबच्या आधी याला फासावर लटकवा- बाळासाहेब

Last Updated: Monday, August 13, 2012, 08:41

म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. मात्र या साऱ्यात क्लेशकारक गोष्ट घडली.

सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित

Last Updated: Sunday, August 12, 2012, 17:00

सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

Last Updated: Monday, August 13, 2012, 16:02

मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं.

मुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड

Last Updated: Sunday, August 12, 2012, 06:43

आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.

मध्य रेल्वेचे डबे रुळावरून घसरले...

Last Updated: Friday, July 13, 2012, 08:46

रात्री उशिरा कर्जतहून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलचे तीन डबे सीएसटी स्टेशनजवळ घसरले. सुदैवाची गोष्ट म्हणजे रात्री उशिराची वेळ असल्यानं ट्रेनमध्ये फारसे प्रवासी नव्हते.

अपहृत संगीता मुंबईत परतली

Last Updated: Thursday, July 12, 2012, 08:43

सीएसटी स्टेशनवरून पळवून नेऊन हरिद्वारमध्ये सापडलेल्या परभणीच्या संगीताला रात्री उशीरा मुंबईत आणण्यात आलं.

सीएसटी: अपहरण केलेली मुलगी हरिद्वारमध्ये सापडली

Last Updated: Saturday, July 7, 2012, 14:11

सी एस टी स्थानकावरून १० जूनला संगीता या ३ वर्षीयं मुलीला मध्यरात्री एका इसमानं पळवून नेलं होतं. संगीताला पळवून हरिव्दारमध्ये नेण्यात आलं होतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे पोलिसांना अपहृत संगीता सापडली आहे.

असुरक्षित बालपण...

Last Updated: Saturday, July 7, 2012, 06:36

शुक्रवारचा संपूर्ण दिवसभर ज्याची चर्चा होत राहिली ती बातमी म्हणजे सीएसटीवरुन झालेली तीन वर्षाच्या मुलीची चोरी.. महिन्याभरापूर्वी घडलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. सीसीटीव्हीत जरी चोर सापडला असला तरी प्रत्यक्षात हा चोर कधी सापडणार? हाच सवाल आता सारे करतायत. मुलांच्या चोरीच्या कारणांची आणि वास्तवाची चर्चा यावरच करुयात थोडीशी चर्चा...

‘मुलगी चोर’ सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Friday, July 6, 2012, 15:49

ही बातमी आहे एका चोरीची... ही चोरी म्हणजे दागिने किंवा पैशांची नव्हे... तर ही चोरी आहे चक्क एका लहानग्या मुलीची... महत्त्वाचं म्हणजे हा मुलगी चोर सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलाय.

खोळंबलेली हार्बरची रेल्वे सेवा रूळावर

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 11:11

हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेने प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतल्याने हार्बरची रेल्वे सेवा हळूहळू रूळावर आली आहे. आधी एकमार्ग सुरू करण्यास यश आले.

म. रे. रखडली, लोकलचा डब्बा घसरला.

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 07:40

सीएसटी-कल्याण लोकलचा डबा घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा खोळंबली. सीएसटी-मस्जिद रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून निघाली होती. या लोकलचा सातवा डबा घसरला.