मुजफ्फरनगर दंगल : राजकीय नेत्यांविरुद्द अटक वॉरंट, Muzaffarnagar riots: arrest warrants issued against politicians

मुजफ्फरनगर दंगल : राजकीय नेत्यांविरुद्द अटक वॉरंट

मुजफ्फरनगर दंगल : राजकीय नेत्यांविरुद्द अटक वॉरंट
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात एका स्थानिक कोर्टानं १६ जणांविरुद्ध वॉरंट बजावलंय. दंगल भडकावल्याचा आरोप ठेऊन उत्तर प्रदेशचे सहा राजकीय नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आलंय. हे सहा नेते भाजप आणि बीएसपीचे नेते आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपा खासदार कादिर राणा, भाजप आमदार संगीत सोम आणि भारतेंदू सिंह, बसपा आमदार नूर सलीम आणि मौलाना जमील, काँग्रेसचे नेते सईदुज्जजमा आणि भारतीय शेतकरी युनियनचे प्रमुख नरेश टिकेत यांच्यासोबतच अन्य १६ राजकीय आणि सामूदायिक नेत्यांविरुद्ध हे अटक वॉरंट बजावण्यात आलंय. वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार या लोकांविरुद्ध दोन दिवसांच्या आत कारवाई करण्यात येईल.

‘भडकाऊ भाषणं देऊन सांप्रदायिक हिंसा भडकावल्याचा आरो या लोकांवर आहे’ असं पोलिसांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांमध्ये उसळलेल्या सांप्रदायिक दंगलीत ४७ जणांना आपल्या प्राणाला गमवावं लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 18, 2013, 14:07


comments powered by Disqus