दिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील, Mystery surrounds Ram Singh’s ‘suicide’

दिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील

दिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील
www.24taas.com,नवी दिल्ली

दिल्लीमध्ये झालेल्या सामुहीक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंहच्या आत्महत्येला नवी कलाटणी मिळालीये. रामसिंगच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सनसनाटी आरोप केलाय.

आज पहाटे तिहार जेलमध्ये राम सिंहनं गळफास लावून आत्महत्या केलीये. डिसेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातला रामसिंह हा मुख्य आरोपी होता. रामसिंगची मनस्थिती ठीक नसल्याची माहिती असताना त्याच्यावर देखरेख का ठेवली गेली नाही, असाही सवाल आता उपस्थित होतोय.

दरम्यान, या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आलेत. तसंच अन्य आरोपी मुकेश, पवन, विनय, राजू आणि सहावा अल्पवयीन आरोपी यांची सुरक्षा वाढवण्यात आलीये.

राम सिंह याला आज न्यायालापुढे हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपविले. राम सिंह याला तिहार कारागृहातील तीन नंबरच्या बराकीमध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच त्याने पहाटे पाच वाजता शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतल्याचे समजताच त्याला दिन दयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

First Published: Monday, March 11, 2013, 13:23


comments powered by Disqus