Last Updated: Tuesday, November 19, 2013, 16:08
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद आसाराम बापूचा फरार मुलगा नारायण साई याच्या समस्यांत आणखीनच वाढ झालीय. सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण साई आणि त्याची सहकारी जमुना यांना एक मुलगा आहे. ही गोष्ट नारायण साई याची पत्नी जानकी हिच्या चौकशीतून समोर आलीय.
सूरत पोलीस कमिशनर राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांसमोर जानकीनं काही नवीन आणि धक्कादायक गोष्टी उघड केल्यात. नारायण साईचा एक मुलगादेखील आहे. पण हा मुलगा त्याच्या धर्मपत्नीपासून नाही तर त्याच्या एका सहकारी महिला जमूनापासून आहे.
जानकीनं चौकशीत नारायण साईचे इतर मुलींसोबतही शारीरिक संबंध असल्याचं सांगितलंय. याच गोष्टीमुळे जानकी आणि नारायण साईच्या नात्यांत दूरावा निर्माण झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, जानकीकडून आणखी काही अशीही माहिती मिळालीय जी नारायण साईवरील आरोप सिद्ध करण्यात महत्त्वशीर ठरणार आहे.
गेल्या ४२ दिवसांपासून नारायण साई फरार आहे. सूरत कोर्टानं साईला आत्मसमर्पणासाठी १० डिसेंबर २०१३ पर्यंत मूदत दिलीय. या दरम्यान नारायण साई पोलिसांसमोर स्वत:हून हजर झाला नाही तर पोलीस त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू करतील.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 16:08