Last Updated: Wednesday, March 26, 2014, 13:17
www.zee24taas, झी मीडिया, नवी दिल्ली भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मिरमध्ये प्रचार करण्याच्या आधी वैष्णव देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमध्ये प्रचार रॅलीला सुरुवात करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिले देशभरात नरेंद्र मोदींच्या २६ मार्चपासून १८५ रॅली होणार आहेत. ज्यांची सुरुवात जम्मूमधून होईल. या रॅलीमधून मोदी मतदारांपर्यंत पोहचणार आहेत. तसेच त्यामुळे मोदी ब्रँड अधिक आक्रमक होण्यास मदत होईल असे, पक्षाचे म्हणणे आहे.
देशभरात मोदींच्या प्रचारांची लाट चांगलीच पसरलीय. भाजप `मोंदी फॉर पीएम` या मोहिमेच्या अंतिम टप्पाचे काम करण्यात व्यस्त आहे. मोदी ब्रँड आणखी वेगाने जनतेपर्यंत पोहचण्यासाठी पक्ष रणनीती तयार करीत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 26, 2014, 13:17