चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता, Narendra Modi is not bigger than Atal Bihari Vajpayee: Chidambaram

चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता

चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना शहरी तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत
असल्याचं मान्य केलं. तरी मोदींचा काँग्रेसशी मुकाबला होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

केंद्रीय अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी राहुल गांधींच्याच वक्तव्याला दुजोरा देत काँग्रेसने अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला नसल्याचं म्हटलं. तसंच काँग्रेसपुढे मोदी हे स्पर्धेच्या बाहेरचे असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपवर निशाणा साधताना मोदी काँग्रेसच्या मुकाबल्याचे नाहीत, असं त्यांनी म्हटलं.

२००४ चं उदाहरण देताना चिदम्बरम म्हणाले, कीत्यावेळई भाजपाने पंतप्रधानपदासाठी अटल बिहारी वाजपेयींचं नाव जाहीर केलं होतं. मात्र काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केला नव्हता. तरीही आम्हीच सत्तेत आलो. मोदी हे वाजपेयींएवढे मोठे नेते नाहीत. त्यामुळे आम्हाला मोदींची जराही भीती वाटत नाही.

“भाजपशासित राज्यांमध्येही भ्रष्टाचार आणि घोटाळे झाले आहेत. त्यामुळे मोदींशी जाहीर वाद विवाद करायला आम्ही तयार आहोत”, असं चिदम्बरम म्हणाले. मात्र शहरी तरुणांमध्ये मोदींची लोकप्रियता दिवसें दिवस वाढत असल्याचं त्यांनी मान्य केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013, 16:16


comments powered by Disqus