काँग्रेसने देशाला महागाईत बुडवले – नरेंद्र मोदी, Narendra Modi on Congress vaccine

काँग्रेसने देशाला महागाईत बुडवले – नरेंद्र मोदी

काँग्रेसने देशाला महागाईत बुडवले – नरेंद्र मोदी
www.24taas.com,नवी दिल्ली

काँग्रेस सरकारने देशाला महागाईत बुडवले आहे. काँग्रेस सत्तेवर असणे हे आम्हाला मंजूर नाही, असे म्हणत गुरजतचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी टीका करताना म्हटले, पंतप्रधान पदावर बसवलेली व्यक्ती कामाची नाही. महागाईवरून लक्ष करीत केंद्रातील युपीए सरकावर मोंदीनी हल्लाबोल केला.

तालकटोरा स्टेडिअमवर सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय परिषदेत मोदी बोलत होते. गुजरातमधील भाजपचा विजय हा जनतेचा आहे. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशाला बुडविले आहे. त्यांना देशाच्या विकासाचे काही देणे-घेणे नाही. देशाचा विकास करायचा आहे हे `युपीए`च्या रक्तातच नाही, असे मोदी यांनी म्हणालेत.


भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी माझा शनिवारी केलेला सन्मान मी गुजरातमधील जनतेला समर्पित करतो. गुजरातमधील विकासाच्या बातम्या जगभरात क्रिकेटच्या समालोचनाप्रमाणे प्रसारित आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विकासाकडे लक्ष न देता राजकारण करण्यातच मग्न होते. गांधी कुटुंबातील सदस्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या अध्यक्षपदी सीताराम केसरी यांची निवड ही नाईटवॉचमन प्रमाणे करण्यात आली होती.

महागाईने जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे या सरकारने सत्तेत राहू नये. देशातील नागरिकांना काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहेकाँग्रेसरूप वाळवीवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे फक्त भाजप हा पक्ष आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताला चांगले शासन मिळाले होते, अशी भाजपची स्तुती करून घेतली.

First Published: Sunday, March 3, 2013, 12:43


comments powered by Disqus