नक्षली हल्ल्यातील बळींची संख्या २८वर, Naxal attack: Cong leader Nand Kumar Patel found dead

नक्षली हल्ल्यातील बळींची संख्या २९वर

नक्षली हल्ल्यातील बळींची संख्या २९वर
www.24taas.com, झी मीडिया, रायपूर

काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर छत्तीसगडमध्ये शनिवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून बळींची संख्या २९ झाली आहे. तर जखमीं संख्या ४० वर पोहोचलेय. हल्ल्यादरम्यान अपहरण करण्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांची नक्षलवाद्यांनी निघृण हत्या केली. या दोघांचेही मृतदेह सुरक्षा दलाच्या हाती लागले आहेत.

सुकमा जिल्ह्यातील गिडामघाडी हल्ल्याचा निषेध म्हणून काँग्रेसने छत्तीसगड बंदचे आवाहन केले आहे. तर भाजपने आपली रथयात्रा रद्द केली आहे. या हल्ल्याचे वृत्त समजताच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशी चर्चा केली. तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची चिंता व्यक्त केली. हा हल्ला लोकशाही मूल्यांवर हल्ला असल्याचे मत गांधी यांनी व्यक्त केले. आज काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी थेट छत्तीसगडचा दौरा आयोजित केला आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला करत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या दिनेश या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांचे आज मृतदेह सापडल्याने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नक्षलवादी चळवळीचे अत्यंत हिंसक व भीषण रूप छत्तीसगडमध्ये शनिवारी दिसले. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नेते आणि `सलवा जुडूम`चे प्रणेते महेंद्र कर्मा हे जागीच ठार झाले; तर माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचे अपहरणही केले होते.

छत्तीसगडमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री रमणसिंह यांनी `विकास यात्रा` काढली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने `परिवर्तन यात्रा` काढली. ही यात्रा मृत्यूचे कारण ठरली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 26, 2013, 09:09


comments powered by Disqus