Last Updated: Saturday, May 25, 2013, 23:59
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केलाय. या हल्यात बॉम्बगोळा आणि बंदूकी वापरल्या गेल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळतेय. या हल्ल्यात १७ जण जागीच ठार झालेत तर २० जण जखमी झालेत.
नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झालाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल यांच्या पुत्राचं अपहरण झाल्याचंही समजतंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रसचे नेते विद्याचरण शुक्ल हेही या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. त्यांना तीन गोळ्या लागल्यात. तसंच काँग्रेसचे नेते कवासी लकमा यांनाही गोळी लागल्याचं वृत्त आहे. पोलिसांनीही या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. जगदलपूर आणि सुकमा यांच्यामधे काँग्रेस नेत्यांच्या जमावावर हा हल्ला झाला. पहिल्यांदा बॉम्बस्फोट घडवून आणले गेले आणि नंतर गोळ्यांचा वर्षाव झाल्याचं समजतंय.
मदतीसाठी घटनास्थळी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना तातडीनं धाडण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 25, 2013, 21:07