छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद Naxal attack on security forces in Chhattisgarh

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद
www.24taas.com, झी मीडिया, रायपूर

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले आहेत.

छत्तीसगडचे गृह मंत्री रामसेवक पैकरा यांनी ही माहिती दिली आहे.

स्थानिक लोकांनी या चकमकीत १५ ते २० जण शहीद झाल्याचा दावा केला आहे.

या चकमकीत अनेक जवानांना गोळ्या लागल्या आहेत. तोंगपाल आणि झीरम गावाजवळ रस्ता निर्मितीचं काम सुरू आहे.

रस्ता निर्मिती सुरू असल्याने सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलं होतं. रस्ता निर्मितीचं काम सुरू असतांना, हा हल्ला झाला आहे.

काही जखमींना तोंगपाल तर काहींना जगदलपूरला नेण्यात आलं आहे.

सीआरपीएफचे ३०० जवान घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने रायपूरला नेण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 15:21


comments powered by Disqus