राष्ट्रावादीचा निर्वाणीचा इशारा, काँग्रेसची धावाधाव सुरू, NCP hint, Congress stampede started

राष्ट्रावादीचा निर्वाणीचा इशारा, काँग्रेसची धावाधाव सुरू

राष्ट्रावादीचा निर्वाणीचा इशारा, काँग्रेसची धावाधाव सुरू
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

राष्ट्रावादीनं जागावाटपासंदर्भात निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसची धावाधाव सुरू झालीय. याचपार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची पहिली बैठक दिल्लीत झाली.

ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबईचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर उपस्थित होते. ज्या जागांवर २००९मध्ये पराभव झाला त्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिलीय.

काँग्रेस पराभूत झालेल्या काही जागा राष्ट्रवादीला देण्याची शक्यता आहे. रायगड, जालना, धुळे आणि शिर्डी या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 2, 2014, 23:50


comments powered by Disqus