मुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी, NIA Alerts : Terrorist Attacks in Mumbai

मुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी

मुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांची रेकी दहशतवाद्यांनी केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याची माहिती एनआयए या संस्थेने दिलेय. तसा इशाराही देण्यात आल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याच्या पार्श्वभूमीवर NIA ने अलर्ट दिलाय. पाटणा ब्लास्टमधील अटक करण्यात आलेल्या हैदर अली याच्या चौकशीत ही बाब उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एनआयएच्या इशाऱ्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली आणि मुंबई पोलीस यांना एक पत्र लिहीले आहे. दिल्लीत लोटस मंदिर, आनंदविहार टर्मिनल, कुतुबमीनर यांची रेकी केल्याचे एनआयएने म्हटले आहे.

तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्वाच्या भागांची आणि शहरांची रेकी केल्याचे एनआयएने म्हटले आहे. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 12:37


comments powered by Disqus