Last Updated: Wednesday, January 30, 2013, 23:31
www.24taas.com, पाटणाज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशव्यापी दौ-याला आजपासून पाटण्यात सुरुवात झाली खरी मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही.
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या मुहुर्तावर अण्णांनी या दौ-याला सुरुवात केलीय. भ्रष्ट व्यवस्था बदलण्याचा नारा अण्णांनी पाटण्यात झालेल्या सभेत दिला. सकाळी 11 वाजता पाटण्याच्या गांधी मैदानात फार थोडी गर्दी दिसली. दुपारीही समर्थकांची गर्दी काही वाढत नव्हती. अण्णांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी येणा-यांची गर्दी इतकी कमी असू शकते का असा प्रश्न यानिमित्तानं सर्वांच्याच मनात उपस्थित होईल. अण्णांची क्रेझ कमी तर झाली नाही ना...
जे समर्थक अण्णांना ऐकण्यासाठी उपस्थित होते ते मात्र या गर्दीपेक्षा भ्रष्टाचारावर बोला असंच सांगताना दिसत होते. पाटण्यात अण्णांना हा प्रतिसाद तर देशात इतर ठिकाणी कसा प्रतिसाद मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
First Published: Wednesday, January 30, 2013, 23:31