प्रीतीच्या अंत्यसंस्काराला नकार! No Funeral for Priti

प्रीतीच्या अंत्यसंस्काराला नकार!

प्रीतीच्या अंत्यसंस्काराला नकार!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मुंबईतल्या ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

आज प्रीतीच्या पार्थिवार दिल्लीत अंत्यसंस्कार होणार होते. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करायला नकार दिला आहे. दरम्यान आता प्रीतीच्या मृत्यूवरुन राजकारण तापू लागलंय. प्रीतीचा बळी ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणातले आरोपी अजूनही मोकाट आहेत.

प्रीतीच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं दिलेली केवळ २ लाखांची मदत हा प्रीतीचा अपमान आहे अशी टीका सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 21:33


comments powered by Disqus