हत्येला मी घाबरत नाही, भाजप जातीय दंगल घडवतं - राहुल Not afraid of getting killed, says Rahul Gandhi

हत्येला मी घाबरत नाही, भाजप जातीय दंगल घडवतं - राहुल

हत्येला मी घाबरत नाही, भाजप जातीय दंगल घडवतं - राहुल
www.24taas.com, झी मीडिया, जयपूर

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप मतांसाठी जातीय दंगली घडवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. आपल्या आजी आणि बाबांची हत्या करण्यात आली त्यामुळं आपल्यालाही जिवंत ठेवणार नसल्याचं वक्तव्य केलं. मात्र आपण घाबरत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विकासाचं काम केवळ आणि केवळ काँग्रेसचं करतं, भाजप केवळ दंगल घडवतं, असा थेट आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला. मी भाजपच्या राजकारणाच्या विरोधात आहे कारण, मुजफ्फरनगर, गुजरात दंगल आणि उत्तर प्रदेशमधील आग भाजपनं लावली, असंही राहुल गांधी म्हणाले.

भाजप हिंदू-मुस्लिमांमधील तेढ वाढवतात. देशात आग लावण्याचं काम भाजप करतंय. मात्र त्याचा देशाला काहीच उपयोग होणार नाही. लोकांच्या मनातील राग जाण्यासाठी अनेक वर्ष लागतात.

माझ्या आईनं आजीच्या आणि बाबांच्या हत्येविषयी सांगितलं. जशी त्यांची हत्या झाली तशीच माझी पण होऊ शकते. मात्र मी भीत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 14:43


comments powered by Disqus