शिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं! Not `Hindu` but `saffron`- Shinde

शिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!

शिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!
www.24taas.com, जयपूर

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानावर चक्क कोलांटउडी मारली आहे. एआयसीसी बैठकीतल्या भाषणात बोलताना त्यांनी `हिंदू` हा शब्द स्पष्टपणे वापरला होता. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना आपण `सॅफ्रॉन` म्हणालो, ‘हिंदू’ म्हणालोच नाही असं सांगत घूमजाव केलं.

दुसरीकडे गृहमंत्रालयाकडे आलेल्या काही रिपोर्टचा हवालाही शिंदेंनी दिला होता. ‘समझोता एक्सप्रेस’, ‘मालेगाव आदी ठिकाणीचे स्फोट’ अशाच केंद्रांत प्रशिक्षित झालेल्या अतिरेक्यांनी केले असल्याचंही शिंदे म्हणाले होते. मात्र मीडियाशी बोलताना त्यांनी पेपरमधल्या बातम्यांचा हवाला दिला.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू अतिरेकी बनवण्याची प्रशिक्षण केंद्रं चालवत असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केला होता. यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर शिंदेनी आपल्या या विधानावर चक्क घूमजाव केलं.

First Published: Sunday, January 20, 2013, 16:31


comments powered by Disqus