एक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी, older population in MP is more

एक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी

एक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.

मध्यप्रदेश जनगणना कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या आकड्यानुसार २००१ मध्ये झालेल्या जनगणने दरम्यान वयाची १०० वर्षी पूर्ण करणाऱ्या लोकांची संख्या ८,४३१ इतकी होती... हीच संख्या दहा वर्षानंतर म्हणजेच २०११ साली ३२,१७२ वर पोहचलीय.

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मध्यप्रदेशची एकूण लोकसंख्या सात करोड, २६ लाख, २६ हजार, ८०९ इतकी आहे. या जनसंख्येच्या जवळजवळ ३७.५० टक्के लोक १८ ते ४० वर्ष वयाच्या वर्गात मोडतात. तर, २००१ साली एकूण लोकसंख्या होती सहा करोड, तीन लाख, ४८ हजार ०२३ इतकी होती. ज्यापैंकी सुमारे ३६.६ टक्के लोकांचा समावेश १८ ते ४० वर्ष वयाच्या वर्गात होत होता.

राज्यात १८ ते ४० वर्ष वयाच्या लोकांमध्ये सर्वात अधिक लोकसंख्या आहे ती इंदौरमध्ये... इथं या वर्गातील जनसंख्या १३ लाख, ५८ हजार, ४१७ इतकी आहे. या गटात १०,२५१ लोकसंख्येसहीत जबलपूर दुसऱ्या स्थानावर, ९,८८,८९९ लोकसंख्येसहीत भोपाळ तीसऱ्या स्थानावर, ९,००,२२९ लोकसंख्येसहीत सागर चौथ्या तर ८,४६,१३२ लोकसंख्येसहीत रीवा पाचव्या स्थानावर आहे. राज्यात १८ ते ४० वयोवर्षांची सर्वात कमी लोकसंख्या आढळलीय ती हरदा जिल्ह्यात... हरदामध्ये या वयोगटातील लोकांची संख्या आहे १२,५४४.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 11:11


comments powered by Disqus