८० करोड लोकांना स्वस्त धान्य?, Parliament to debate Food Security ordinance today

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?
www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ही महत्वाकांशी योजना आहे. या अध्यादेशात काही बदल केल्यास त्याला आपला पाठिंबा असल्याची भूमिका बिजेपीने घेतली आहे. तर या अध्यादेशाला विरोध करणार्या समाजवादी पक्षाने ही आता नरमाईची भूमिका घेतली आहे.
कालपासून सुरू झालेल्या अधिवेशनात कामकाजाचे कमी दिवस आणि अनेक विधेयक मंजुरीसाठी आहेत. काल दिवस भर तेलंगाणाच्या मुद्द्या वरुन संसदेत गोंधळ झाल्याने कामकाज झाले नाही. आजतरी कामकाज होत का, हे प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान या अधिवेशनात महत्वाची विधेयक मांडली जाणार असल्यामुळे सोनिया गांधी यांनी पक्षातील सर्व खासदारांना सदनात उपस्थिती राहण्याची सूचना दिली आहे.

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं या पतंप्रधानांच्या आवाहनाला पहिल्याच दिवशी हरताळ फासला गेला. दोन्ही सदनात झालेल्या गदारोळामुळे दुपारी तीननंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. या गदारोळातच अन्न सुरक्षा विधेयक सादर करण्यात आलं. आता उरलेल्या दिवसात हे विधेयक संमत करण्याचं आव्हान सरकारसमोर असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013, 09:13


comments powered by Disqus