Last Updated: Monday, September 24, 2012, 16:20
www.24taas.com, नवी दिल्लीसहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अर्थमंत्री पी चिंदंबरम यांना भेटणार आहेत.
अडचणीत असलेल्या या बँकांना राज्य सरकारकडून 500 कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी असमर्थता दाखवली होती. नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, धुळे, नंदुरबार आणि उस्मानाबाद या सहा जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार 30 सप्टेंबरपर्यंत न सुधारल्यास या बँकांना परवाने मिळणार नाहीत.
या सहा बॅंकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. या बँकांचा कारभार सुधारण्यासाठी 500 कोटी रुपयांची गरज आहे. या बँकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री दिल्लीत प्रयत्न करतायेत.
First Published: Monday, September 24, 2012, 16:20