पेट्रोलच्या दरात ९५ पैशांनी घट!, petrol price decreases by 95 paisa

पेट्रोलच्या दरात ९५ पैशांनी घट!

पेट्रोलच्या दरात ९५ पैशांनी घट!
www.24taas.com, मुंबई

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी... पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा थोडी का होईना पण घट होणार आहे. पेट्रोलचे दर ९५ पैशांनी कमी केले गेलेत. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत.

पेट्रोलचे दर कमी झाल्यानं वाहनधारकांना थोडा दिलासा मिळालाय. गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. इंधनांच्या किंमती वाढल्यानं परिणामत: महागाईच्या आगीतही तेल पडतंय. त्यातचं दिवाळीचे दिवस असल्यानं सर्वसामान्यांचं मात्र दिवाळं निघतंय. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल आता ९५ पैशांनी स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय.

First Published: Thursday, November 15, 2012, 18:51


comments powered by Disqus