Last Updated: Friday, September 13, 2013, 21:31
www.24taas.com,नवी दिल्लीपेट्रोलच्या किमती आज मध्यरात्रीपासून प्रति लिटर १.६३ रुपयांनी वाढणार असल्याचे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. गेल्या जून महिन्यापासून ही सातवी दरवाढ आहे.
याआधी एक सप्टेंबर रोजी प्रति लिटर २.३५ रुपयांनी पेट्रोल महागले होते. या महिन्यातली ही दुसरी भाववाढ आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव प्रति बॅरल महागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या दरवाढीमुळे स्थानिक करांचा विचार करता पेट्रोलचे भाव प्रति लिटर दोन रुपयांच्या आसपास महागण्याची शक्यता आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ८३.६३ रुपये इतका होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 13, 2013, 21:31