पेट्रोलचा पुन्हा भडका, १.६३ रुपयांनी महाग

Last Updated: Friday, September 13, 2013, 21:31

पेट्रोलच्या किमती आज मध्यरात्रीपासून प्रति लिटर १.६३ रुपयांनी वाढणार असल्याचे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. गेल्या जून महिन्यापासून ही सातवी दरवाढ आहे.

अरे बापरे! डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 10:01

रुपयाच्या घसरणीचा फटका डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

डिझेलची ३ रुपयांनी दरवाढ!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 13:02

देशात महागाईचा भडका उडण्याची अधिक चिन्हं आहेत. कांद्याने पेट्रोल आणि डिझेलला मागे टाकत ७० रूपयांपर्यंत मजल मारली आहे. यातच आता डिझेलची ३ रूपयांनी दरवाढ करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. आधी दरमहिन्याला ५० पैसे वाढ होणार होती.

पेट्रोल-डिझेलमध्ये दोन महिन्यांत पाचवी दरवाढ...

Last Updated: Thursday, August 1, 2013, 13:13

तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय.

पेट्रोलनंतर डिझेल महागले

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 09:53

पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. महागाईच्या आगीत पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलच्या दरात ५० पैशानी वाढ करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतलाय. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागूही झाली आहे.

डिझेलच्या दरात ४५ पैशांनी वाढ

Last Updated: Friday, March 22, 2013, 20:42

डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. लीटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. हे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

पेट्रोल स्वस्त तर डिझेल महाग

Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:13

पेट्रोलच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, त्याचबरोबर डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दराबाबत १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून अमलात येण्याची शक्यता आहे.

डिझेल ४५ पैशांनी महागले, पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

Last Updated: Friday, January 18, 2013, 09:47

सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत. डिझेल ४५ पैशांनी महागले आहे.

डिझेल-केरोसीनमध्ये १० रुपये वाढ?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 21:30

डिझेल आणि केरोसिनचे भाव तब्बल 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय.

ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 20:56

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

डिझेल दर वाढणार दर महिन्याला

Last Updated: Monday, July 16, 2012, 19:20

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी, चारी बाजूंनी होणाJdया टीकेला उत्तर देण्यासाठी सरकार काही कडक पावलं उचलण्याचा विचारात आहे. ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

डिझेल दराचा उडणार भडका

Last Updated: Thursday, July 12, 2012, 19:19

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं पीटीआयनं म्हटलंय. दरवाढ अटळ आहे, मात्र ती कधी होणार याची तारीख आत्ताच सांगता येणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय.

उपकार झाले, गॅस, डिझेलचे भाव नाही वाढले

Last Updated: Monday, May 28, 2012, 17:13

केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री जयपाल रेड्डी यांनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. तूर्तास डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच केरोसिनचे दरही वाढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

डिझेल महागण्याची शक्यता

Last Updated: Sunday, April 22, 2012, 22:54

डिझेलच्या किंमती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात डिझेल नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी दिलेत. डिझेल नियंत्रणमुक्त करणं ही राजकीयदृष्ट्या मोठी संवेदनशील गोष्ट आहे. त्यामुळं काही प्रमाणात नियंत्रण हटवण्याचे संकेत बसू यांनी दिले.