Last Updated: Wednesday, April 16, 2014, 11:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.
यानुसार, पेट्रोलचे नवीन दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झालेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यानं ही कपात करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. आयात तेल स्वस्त झाल्यानं एकाच महिन्यात ही पेट्रोलच्या दरांत दुसरी कपात आहे.
या कपातीत लोकल सेल्स टॅक्स किंवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्येक शहरानुसार किंमतीत थोडाफार बदल दिसून येईल.
मुंबईत पेट्रोलच्या दरांत ८९ पैशांनी घट होईल. त्यामुळे ग्राहकांना ८०.८९ रुपये प्रती लिटर मोजावे लागतील. तर दिल्लीत पेट्रोलचे दर ८५ पैशांनी घटणार आहेत. त्यामुळे एका लिटरसाठी ग्राहकांना ७१.४१ रुपये मोजावे लागतील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 11:23